Sr.No. |
Dos |
Donts |
1. |
भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याकरीता अेसीबीला सहकार्य करा. सरकारी कामाकरीता आपल्याकडे लाचेची मागणी होत असेल तर अेसीबीला कळवा.अेसीबी टोल फ्री क्र. 1064 व्हाॅटस अप क्र. 9930997700 |
लाच मागणी विरोधात अेसीबीकडे तक्रार करण्यास घाबरू नका. भ्रष्ट्राचाऱ्यांना पाठीशी घालू नका. |
2. |
सर्वच सरकारी कामांकरीता पैश्यांची गरज नसते. सरकारने बहुतांश सेवा, सुविधा, सरकारी दाखले,प्रमाणपत्रे नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. त्याची माहिती घ्या. |
सरकारने उपलब्ध करून दिलेल्या विनामूल्य सेवा,सुविधांकरीता पैश्यांची मागणी झाल्यास पैसे देऊ नका. |
3. |
काही सरकारी फाॅर्म वा इतर कामाकरीता फी आकारण्यात येते. त्याची खातरजमा करूनच फी ची रक्कम दया व पावतीची मागणी करा. |
विनामूल्य फाॅर्म करीता वा आकारण्यात आलेल्या फी पेक्षा अधिक रक्कम आपल्याकडून घेत असल्यास अधिकचे पैसे देऊ नका |
4. |
सापळा कारवाईकरीता किंवा इतर कसल्याही तक्रारीची नोंद करण्याकरीता अेसीबी नागरिकांकडून फी घेत नाही. अेसीबीच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या तथाकथित संस्था नागरिकांना अेसीबीचे सदस्य करण्याकरीता किंवा मदत पुरविण्याकरीता फी घेतात. त्यामुळे अशी कोणी मध्यस्थी करण्याकरीता वा मदत करण्याकरीता पैस मागत असेल तर त्याची नजीकच्या पोलीस ठाणेत तक्रार करा. |
अेसीबीचा लोगो वापरणाऱ्या वा अेसीबीच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या तथाकथित संस्थांपासून दूर रहा व त्यांच्या प्रलोभनांना बळी पडू नका. |
5. |
शासकीय व कायदेशीर नियमांचे सर्वतोपरी पालन करा. |
वाजवी सरकारी कामासाठी कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांचे कोणत्याही दबावाला बळी पडू नका. कोणत्याही स्वरूपात लाच देवू नका आणि लाच घेवू नका. |